सांगलीत अग्नीतांडव; चौघांचा होरपळून मृत्यू

दोघांची प्रकृती गंभीर

सांगली /10 नोव्हेंबर : विट्यातील सावरकरनगरमध्ये असणार्‍या विष्णू जोशी यांच्या जय हनुमान स्टील सेंटर दुकानाला आज सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
या भीषण आगीत दुकान मालक विष्णू पांडुरंग जोशी (वय 47), त्यांची पत्नी सुनंदा विष्णू जोशी (वय 42), मुलगी प्रियांका योगेश इंगळे (वय 25) आणि नात सृष्टी योगेश इंगळे (वय 2) या चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. भीषण आग लागल्याचं कळताच तातडीने अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं. सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात वाटणारी आग आसपासच्या लोकांनी विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण केलं होतं. विटा नगरपालिका अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळावर दाखल झाला. सतर्क नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. विट्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या सावरकरनगरमध्ये विष्णू जोशी यांच्या स्वतःच्या तीन मजली इमारतीत जय हनुमान स्टील सेंटर दुकान आहे. पहिल्या मजल्यावर जय हनुमान स्टील सेंटर दुकान आहे. तर उर्वरित इमारतीत जोशी यांचं कुटुंब राहतं. दरम्यान आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास जय हनुमान स्टील सेंटर दुकानाच्या शटरमधून अचानक धूर येताना दिसला. या आगीची माहिती विटा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानंतर तातडीने विटा नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या अचानक लागलेल्या आगीत इमारतीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावर जोशी कुटुंबातील सहा जण अडकले होते.

संबंधित बातम्या

Back to top button