प्रसिद्ध किर्तनकार माधव श्रीवाड यांचा होरपळून मृत्यू

मुंबई/15 जानेवारी – अपघात इतका भयंकर होता की, अह मदपूर येथील शिक्षक तथा प्रसिद्ध किर्तन कार माधव श्रीवाड यांचा कार मध्येच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. दहा दिवसांपूर्वीच श्रीवाड एका कार अपघातातून बचावले होते. पण आज त्याच महामार्गावर काळाने त्यांच्यावर घाला घातला. मिळालेल्या माहितीनुसार, माधव श्रीवाड हे त्यांच्या कारने किनगावकडून अहमदपूरच्या दिशेने येत होते.सकाळी साडेअकराच्या सुमारास काजळ हिप्परगा शिवारात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार दुभाजकाला जोरात धडकली. त्यानंतर काही क्षणातच या कारने पेट घेतला. त्याचदरम्यान गाडीत असणार्‍या श्रीवाड यांना दरवाजा उघडण्याची संधीच मिळाली नाही. कारने पेट घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.हे विदारक दृश्य पाहून रस्त्यावरील प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र आगीच्या तीव्रतेमुळे कोणालाही जवळ जाता आले नाही.

संबंधित बातम्या

Back to top button