पोलिसांची उणीव भरुण काढण्यासाठी होमगार्डला सक्षम करा

आ. संजय खोडके यांची सभागृहात सुचना

मुंबई/ 2 जुलै: महाराष्ट्र राज्य विधीमंडळ पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेच्या सभागृहातील बुधवार दिनांक 2 जुलै रोजी आजच्या कामकाजादरम्यान गृह विभागाशी संबंधित प्रशोत्तराच्या तासामध्ये आ. संजय खोडके यांनी सुरक्षा बंदोबस्त वाढवत असतांना होमगार्डचे आरक्षण वाढविण्यासाठी गृहविभागाने उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केली. यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आधीच धोरण ठरविण्यात आले असून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या माध्यमातून आवश्यक बंदोबस्त पुरविला जात असल्याबाबत सभागृहाला अवगत केले.
विधान परिषदेत गृहविभागाशी संबंधित प्रश्नोत्तरासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी पोलीस भरती, पोलीस वसाहत, पोलीस कल्याण, अनुकंपावरील नियुक्त्या व पोलीस सुरक्षा आदी संदर्भात चर्चा सुरु असतांना आ. संजय खोडके यांनी पोलीसांवरील ताण व अतिरिक्त कामाचा बोजा कमी करण्यासाठी होमगार्ड विभाग अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगितले. सद्या पोलीस भरती मोठ्या प्रमाणावर होत नसल्याने पर्यायी यंत्रणा म्ह्णून होमगार्ड जवानांचा वापर करण्याची गरज आहे. असे ते म्हणाले.
याकरिता आपण जो मानधनावर सुरक्षा बंदोबस्त पुरवितो त्यामध्ये होमगार्ड यांना प्रक्षिक्षण देऊन सुरक्षा बंदोबस्तात होमगार्डची उपयुक्तता वाढल्यास पोलिसांची गृह खात्यात असलेली उणीव भरून काढता येणार आहे. त्यामुळे होमगार्डचे आरक्षण वाढवणार आहे का? असा प्रश्न आ. संजय खोडके यांनी उपस्थित केला. यावर गृहखात्याच्या मंत्री या नात्याने उत्तर देतांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या संदर्भात आधीच धोरण ठरविण्यात आले असून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या माध्यमातून आवश्यक बंदोबस्त पुरविला जात असल्याचाबाबत सभागृहाला अवगत केले. पोलीस भरतीमधील ज्या नियोजित जागा भरण्यात आल्या, त्यापुढील जागा आपण पोलीस निवड प्रक्रियेमधूनच खाजगी सुरक्षा मंडळाकडे देतो. असा निर्णय आधीच झाले असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button