उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर ड्रोनच्या घिरट्या

मातोश्रीवर नजर ठेवली जात असल्याचा आरोप

मुंबई /9 नोव्हेंबर – शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी ड्रोन घिरट्या घालत असल्याचे समोर आले. मातोश्री निवासस्थानाची टेहळणी केली जात आहे का, अशी शंका यामुळे निर्माण झाली. मातोश्री परिसरात ड्रोन उडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ड्रोनच्या माध्यमातून मातोश्री निवासस्थानावर नजर ठेवली जात आहे का, असाही सवाल राजकीय वर्तुळातून विचारला जाऊ लागला. यानंतर खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मातोश्री येथे पोहोचले आहेत.
उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर ड्रोन फिरत असल्याचा व्हिडिओ रविवारी समोर आला. मातोश्रीवर ड्रोन घिरट्या घालत असल्याचे लक्षात आल्यानंतर मातोश्रीवर ड्रोनने नजर ठेवली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. या ड्रोनचे व्हिडिओ वेगाने व्हायरल झाले. हवेत उडणारा ड्रोन कोणाचा असाही सवाल उपस्थित होऊ लागला. मातोश्री परिसरात ड्रोन उडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून मातोश्रीवर नजर ठेवली जात असल्याचा आरोप करण्यात आला. मातोश्रीवर ड्रोनने नजर ठेवली जात असल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आणि खेरवाडी येथे ड्रोन उडवले जात आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button