धनगर समाजाने ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व करावे

आरक्षणावर प्रकाश आंबेडकर यांचे मोठे वक्तव्य

मुंबई/5 ऑक्टोबर – राज्यात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये मराठा आरक्षण आंदोलनानंतर वितुष्ठ निर्माण झाले आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे सातत्याने करत असल्याने ओबीसी समाज दुखावला आहे. ओबीसी समाजाने या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या निर्णयाचा कायम विरोध केला आहे. या विरोधात ओबीसींनी पुन्हा लढा सुरु केला असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींच्या लढ्याला पाठींबा देत नवीन मागणी केली आहे.

धनगर समाजासाठी दीपक बोराडे यांनी पंधरा दिवसांपासून जालना येथे उपोषण सुरु केले होते. त्यांच्या तब्येतीखाली असल्यामुळे त्यांनी 2 ऑक्टोबरला उपोषण मागे घेतले. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे भाष्य केले असून, त्यांनी म्हटले की धनगर समाजाने ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व केले पाहिजे. ओबीसींना सध्या 27 टक्के आरक्षण आहे, परंतु तेलंगणा राज्यासारखे ते 62 टक्क्यांवर देखील नेता येईल, असे आंबेडकर यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, धनगर समाजाने महाराष्ट्र विधानसभेची सत्ता हाती घेऊन आरक्षण वाढवावे, तरच समाजाला न्याय मिळेल. ओबीसींनी राज्याची सत्ता हाती घ्यावी आणि लोकांनी डउ आणि डढ उमेदवारांना मतदान करावे; जर ते नसतील तर मुस्लीम उमेदवारांना मतदान करावे. सवर्ण लोकांनी अन्याय केला आहे, त्यामुळे ओबीसी लोकांनी सवर्णांना मतदान करू नये, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. त्यांनी सांगितले की, सर्वांची सामाजिक आणि राजकीय ओळख आता जिवंत झाली पाहिजे, आणि सर्व समाजाने एकत्र येऊन ओबीसी ओळख मजबूत करावी.

संबंधित बातम्या

Back to top button