राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी; उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले

मुंबई/17 नोव्हेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षा विरोधात कथित ’द्वेषयुक्त भाषण’ प्रकरणी एफ आयआर नोंद वण्याची आणि पक्षाची नोंदणी रद्द करण्याची मागणी करणार्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने दोन्ही यंत्रणांना चार आठवड्यांच्या आत आपले उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. राज ठाकरे आणि मनसेकडून वारंवार उत्तर भारतीय नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्याविरोधात द्वेषपूर्ण विधाने केली जातात. विशेषत: निवडणुकीच्या वेळी असे प्रकार वाढतात.




