लाडक्या बहिणींना लवकरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याची प्रतीक्षा पात्र लाभार्थी महिलांना आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी महिला व बालविकास विभागाकडे 410 कोटी रुपये वर्ग केले आहेत. त्यामुळे लवकरच लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याची रक्कम शासनाकडून अदा केली जाऊ शकते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 410 कोटी रुपये वर्ग करण्यासंदर्भातील शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाकडून घेतला गेला आहे.




