काँग्रेस खा.प्रणिती शिंदे भाजपात जाणार

मुंबई/4 जानेवारी -स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दरम्यान महायुतीमध्ये मोठी इनकमिंग सुरूय. याच दरम्यान एका राजकीय बातमीमुळे सोलापूरसह राज्याचं राजकारणात मोठी उलटफेर होणार आहे. महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे ह्या भाजपमध्ये जाणार आहेत. खासदार शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची डील झालीय असा दावा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केलाय. या दाव्यामुळे सोलापूरसह राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडालीय.
वंचित बहुजन आघाडीने सोलापूर महापालिकेसाठी 22 उमेदवार निवडणुकीत रिंगणात उतरवलेत. त्यांच्या प्रचारार्थ सुजात आंबेडकर यांनी आज सोलापुरात सभा घेतली. या सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी पुन्हा एकदा खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर आरोप केले. याशिवाय प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केलाय.

संबंधित बातम्या

Back to top button