स्थानिक निवडणुकीत स्पर्धा म्हणजे वैर नाही

आमचा शत्रू फक्त महाविकास आघाडी

* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती

अक्कलकोट /23 नोव्हेंबर : लोकसभा निवडणुकीत एनडीए सोबत राहून नरेंद्र मोदींचे हात आम्ही अधिक बळकट केले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही एकत्र लढलो आणि प्रचंड यश मिळवले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लढलो म्हणजे ते आमचे शत्रू नाहीत, आमचा खरा शत्रू फक्त महाविकास आघाडी आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री सोलापूर दौर्‍यावर असून अक्कलकोट येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर काहींच्या पोटात दुखायला लागलं आहे. अजूनही काहींना एक सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झालेला पचत नाही. त्यामुळे त्यांची मळमळ अजूनही सुरूच आहे. ते पुढे म्हणाले माझ्यावर टीका करणार्‍यांनी आधी आत्मपरीक्षण करावे. मी कुठून आलो? एक साधा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला, ही गोष्ट काहींना अजूनही समजत नाही. माझे नाव घेतल्याशिवाय काही लोकांना झोप लागत नाही, भूक लागत नाही आणि दिवस सुरु होत नाही. अशी खरमरीत टीका त्यांनी केली. महायुतीचं सरकार चांगलं काम करत आहे. काही माध्यमांमधून सरकारविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु जनता भ्रमित होणार नाही. कारण जनता आणि आमचे कार्यकर्ते वास्तव जाणतात. असे म्हणत शिंदे यांनी सामनामध्ये छापून आलेल्या अग्रलेखाचा देखील समाचार घेताला.

संबंधित बातम्या

Back to top button