‘कम ऑन किल मी’, उद्धव ठाकरे गरजले

विरोधकांना आव्हान देत जोरदार फटकेबाजी

-म्हणाले…गद्दारांचे नामोनिशान मिटवणार
-भाजपवरही हल्लाबोल
मुंबई / 19 जून: शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. ‘मी या गद्दारांसमोर उभा आहे, म्हणतोय कम ऑन किल मी, असेल हिंमत तर या अंगावर, फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा, अमिताभचा पिक्चर होताना अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन येतो तसं येत असाल तर अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन या. येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपावर घणाघात केला. ‘जर तुम्हाला वाटत असेल शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामोनिशान महाराष्ट्राच्या धर्तीवरून मिटवून टाकल्याशिवाय राहणार नाही, भाजपचं नामोनिशाण मिटवून टाकू, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, आज तर मी तयारीने उभा आहे. 92-93 साली जेव्हा दंगा भडकला होता, तेव्हा तुम्हीच रस्त्यावर उतरला होता. तेव्हा एक व्यक्ती आली होती हे बाळासाहेबांकडे आली होती. बाळासाहेब आता बस्स झालं, पुरे झालं, ती व्यक्ती कोण सांगणार नाही, ते हयात आहेत.
यावेळी भाजपवरही उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, आम्ही इंडियन मुजाहिद्दीन असल्याचं ते सांगतायत. मग तुम्ही कोण? तुम्ही जगभर फिरले. पण कठीण काळात एकही देश तुमच्या बाजूने उभा राहिला नाही. पण आम्ही उभे राहिलो. तुम्ही देशाचे मित्र तोडून टाकत आहात. संकट आल्यावर आमचे खासदार जगभरात पाठवत आहात. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा डोकलामची घटना घडली. तेव्हा आमची हीच भूमिका होती की पंतप्रधान तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. आताही आमची तीच भूमिका होती. पक्ष, मतभेद राहतील, पण देश म्हणून आपण एकत्र आहोत. ते करण्याचा प्रयत्न आम्ही केला, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला.
-राज ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीबद्दल सूचक विधान केले. बातम्या सुरू आहेत. काय होणार? कसलं? होणार का? होणार की नाही होणार, कळेल ना. राज्याच्या मनात आहे तेच मी करणार आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले. पण ते होऊ नये, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर गाठीभेटी घेऊ लागले. हॉटेलात भेटतात. मालकाचे नोकर तुम्ही, जर का मुंबईवर ताबा मिळाली नाही. मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आली. अरे आम्ही घेणारच आहोत. मराठी माणसाच्या ताब्यात मुंबई गेली तर मालकाचं कसं होणार. मालकाच्या मित्राचं कसं होणार म्हणून मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये. म्हणून शेठजीचे नोकर आणि नालायकपणे वर्धापन दिन साजरा करणारे शेठजीच्या नोकरांचे नोकर आहेत. तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही पाहू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button