छगन भुजबळ यांना क्लीन चिट

मुंबई : महाराष्ट्रात 2014 मध्ये सत्तांतर झाल्या नंतर तत्का लीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभा गाला महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या चौकशीची परवानगी दिली होती. त्यानंतर मार्च 2016 मध्ये ईडीने छगन भुजबळ यांची 10 तास कसून चौकशी करून त्यांना अटक केली होती. या घोटाळ्याप्रकरणी भुजबळ यांना 2016 ते 2018 या काळात सुमारे 2 वर्षांचा तुरुंगवास सोसावा लागला होता. मात्र पुराव्यांच्या अभावी आणि तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 2021 मध्ये निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर आता छगन भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विशेष न्यायालयानेही मोठा दिलासा दिला आहे.




