अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैननिकांवर गुन्हा दाखल

मुंबई – मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसे सैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरुळ पोलि सांनी हा गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदीचं उल्लंघन आणि नुकसान केल्याप्रकरणी ठाकरेंसह मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरूळ येथील शिवस्मारकाला रीतसर परवानगी न घेता जमावबंदीचं उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेरूळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ भव्य पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून अना वरणाच्या प्रतीक्षेत होता. मनसे नेते अमित ठाकरे यांनी रीतसर परवानगी न घेता या पुतळ्याचे लोकार्पण केले.




