भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे महायुतीत भूकंप

शिंदें सेनेच्या मंत्र्यांची नाराजी, कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार

महायुतीमधील फाडाफोडीवर व्यक्त केली नाराजी

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सेनेच्या नेत्यांना फटकारले

मुंबई/18 नोव्हेंबर – शहाजीबापूंच्या मनातली ही खदखद …हीच खदखद शिंदेसेनेच्या इतर मंत्र्यांनी व्यक्त केली ती थेट कॅबिनेटवर बहिष्कार टाकत…महायुतीतल्या या महाभूकंपाला कारण ठरलंय भाजपचं ऑपरेशन लोटस. भाजपनं मोठा घाव घातला तो थेट एकनाथ शिंदेंवरच..कारण श्रीकांत शिंदेंचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे प्रभावी नेते दिवंगत वामन म्हात्रेंचा मुलगा अनमोल आणि सून अश्विनी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत सकाळी भाजप प्रवेश केला.. हाच प्रवेश शिंदेसेनेला खटकला आणि त्यांनी दुपारच्या मंत्रिमंडळ बैठकीवरच बहिष्काराचं अस्त्र उगारलं. कॅबिनेट झाल्यानंतर शिंदेसेनेचे मंत्री शह-काटशहाचा वाद घेऊन थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या दरबारात पोहोचले. आणि या बैठकीतही जोरदार खडाजंगी झाली. शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. भाजपकडून सुरु असलेल्या पक्षप्रवेशांवर नाराजी बोलून दाखवली. त्यावरुन फडणवीस यांनी शिंदेंच्याच मंत्र्यांना झापल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. उल्हासनगरातून सुरुवात कोणी केली, असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला. तुम्ही केलं तर चालवून घ्यायचं आणि भाजपनं केलं तर आक्षेप घ्यायचा, असं कसं चालेल, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना झापलं. एकीकडे या घडामोडी सुरु असताना दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मुंबईत दोन महत्त्वाचे पक्षप्रवेश उरकले. रविंद्र चव्हाण यांनी पक्ष प्रवेशांचा सपाटा लावल्यानं शिंदेसेनेत नाराजी आहे. त्याच कारणास्तव शिंदेसेनेचे मंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले होते. पण या भेटीचा काडीमात्र फरक पडलेला नाही. चव्हाण यांनी राजू शिंदे, अद्वैय हिरे यांच्या हाती कमळ दिलं. या दोन्ही नेत्यांनी गेल्याच वर्षी शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट आणि दादा भुसे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. शिरसाट, भुसे विजयी झाले. दोघेही मंत्री झाले. पण त्यांच्या विरोधात लढलेल्या नेत्यांना गळाला लावून भाजपनं योग्य तो संदेश शिंदेसेनेला दिलेला आहे.शिंदेसेनेचे आमदार, मंत्री असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपनं तगडे चेहरे आपल्याकडे घेत मिशन 2029 ला सुरुवात केली आहे. शिंदेसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपनं पक्ष प्रवेश करुन घेतलेल्या नेत्यांची यादी मोठी आह

आ.राजेश मोरेंच्या भाजपला फोडाफोडीसाठी शुभेच्छा

कल्याण-डोंबिवली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापलं असतानाच शिवसेनेच्या वरिष्ठ आमदारांनी भाजप नेत्यांना थेट सल्ला देत वातावरण अधिकच रंगतदार केलं आहे. आपलं घर सोडून दुसर्‍याच्या घरात गेलेल्यांना लाख लाख शुभेच्छा फोडाफोडीची सुरुवात त्यांनीच केली. एक नंबर असलेला पक्ष अशा प्रकारच्या फोडाफोडीच्या राजकारणात पडू नये,असा टोला आमदारांनी लगावला.

संबंधित बातम्या

Back to top button