बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल

सरन्यायाधीश भूषण गवई यांना विश्वास

* दिवाणी व फौजदारी न्यायालय इमारतीचे उद्घाटन

मंडणगड/12 ऑक्टोबर : दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत व कमीत कमी खर्चात न्याय मिळावा, या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्नशील राहू, जेणेकरून बाबासाहेबांचे सामाजिक आणि आर्थिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली. मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, पालक न्यायाधीश न्यायमूर्ती माधव जामदार, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. पी. तावडे, महसूल राज्य मंत्री, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव, दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) अमृता जाशे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अमले सावंत, सदस्य संग्राम देशपांडे, वकील संघाचे अध्यक्ष मिलिंद लाखे, आमदार किरण सामंत, विभागीय आयुक्त विजय सायूर, महानिरीक्षक संजय दरड, जिल्हाधिकारी मंजू जिंदल आदी मान्यवर उपस्थित होते. सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते न्यायालयाच्या इमारत प्रांगणातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, तसेच शिल्पाचे अनावरण आणि न्यायदान कक्ष, ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. दिवाणी न्यायाधीश अमृता जाशे आसनावर विराजमान करण्यात आल्या. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या समारंभात सरन्यायाधीश गवई म्हणाले की, आजचा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. न्यायमूर्ती म्हणाले की, मला या दोन उद्घाटनांमध्ये भाग घेण्यास 22 वर्षांनंतर संधी मिळाली असून, हे त्यांच्या कार्यकाळातील अत्यंत महत्त्वाचे क्षण आहेत.

 

संबंधित बातम्या

Back to top button