अशोक चव्हाण यांनी 50 लाख घेऊन तिकीट दिले

निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण

* कट्टर समर्थक माजी नगरसेवकाचा आरोप

नांदेड /1 जानेवारी : राज्यातील महापालिका निवडणुकीतील तिकीट वाटपावरुन सर्वच राजकीय पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची फरफट झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऐनवेळी पक्षात आलेल्या उमेदवारांना कुठे उमेदवारी देण्यात आलीय तर कुठे आर्थिक परिस्थिती पाहूनच तिकीट दिलं गेल्याने निष्ठावंतांची नाराजी उघड होत आहे.
भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत असून नांदेड आणि लातूरमधूनही भाजप समर्थक व निष्ठावंत कार्यकर्ते मनातील खदखद बोलून दाखवत आहेत. माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याने अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अशोक चव्हाण यांनी 50 लाख रुपये घेऊन पैसे वालांना तिकीट दिल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक भानुसिंग रावत यांनी केला आहे. महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पन्नास लाख रुपये घेतल्याचा घराघाती आरोप माजी नगरसेवक तथा चव्हाण यांचे विश्वास भानुसिंग रावत यांनी केला आहे. भानूसिंग रावत हे अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे सन 1980 पासून ते चव्हाण यांच्यासोबत राजकारणात सक्रीय होते. यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 16 मधून त्यांनी आपल्या मुलासाठी भाजपकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, ऐनवेळी पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर, भानुसिंग रावत यांनी अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले असून पैसे घेऊन तिकीट दिल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्षाने बळी घेतला आहे, असेही माजी नगरसेवक रावत यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

Back to top button