अरुण गवळी 18 वर्षांनंतर तुरुंगाबाहेर येणार

मुंबई : कुख्यात गँगस्टर अरुण गवळीला अखेर सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या 18 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या गवळीसाठी हा मोठा दिलासा आहे. गवळीवर शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्येचा खटला चालू होता. या खटल्यात गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती, त्यामुळे तो गेल्या जवळपास दोन दशकांपासून तुरुंगात होता. याआधी, गवळी दुसर्या खटल्यात नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत होता आणि मुंबई हायकोर्टाने मे महिन्यातच जामीन मंजूर केला होता, पण कमलाकर जामसंडेकर खटल्यात जामीन न मिळाल्यामुळे गवळीला तुरुंगातच राहावं लागलं. सुप्रीम कोर्टाने आता या खटल्यातही जामीन मंजूर केल्याने गवळीला मोठा दिलासा मिळाला आहे.




