अंबादास दानवे यांचा कॅश बॉम्ब

छत्रपती संभाजीनगर /9 डिसेंबर – शिव सेना (ठाकरे) नेते तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पैशांच्या थैल्या आणि नोटांची बंडल घेऊन बसलेले काही व्हिडिओ ट्विट केले आहेत. सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीमसाठी पैसे नाही, बाकी सगळं ओक्के आहे! असं म्हणत अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह ते काय करत आहे? असा सवाल केला आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे, त्याच दरम्यान हे ट्विट करुन शिवसेनेने (ठाकरे) सरकारवर निशाणा साधला आहे.




