राज्यसभेच्या सातही जागा बिनविरोध

भाजप-शिवसेनेकडून नवीन चेहर्‍यांना संधी

उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा बाकी

मुंबई/5 मार्च – गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु असलेल्या राज्यसभेच्या सातही जागांवर कोण जाणार? याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. राज्यसभेतील 37 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आणि त्यातील सात जागा या महाराष्ट्राच्या वाट्याला आल्या होत्या. राज्यातील संख्याबळ पाहता, भाजपकडे 4, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे प्रत्येकी एक आणि महाविकास आघाडीकडे एक अशा जागा आल्या होत्या. या जागांवर कोण जाणार? ही निवडणूक बिनविरोध होणार का? असे अनेक प्रश्नांची उत्तरे आज, गुरुवारी 5 मार्च रोजी मिळाली आहे. राज्यसभेच्या जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत गुरुवारी 5 मार्चला होती. यादिवशी भाजपने यादी जाहीर केल्याप्रमाणे 4 जणांना राज्यसभेवर जाण्याची संधी दिली. यामध्ये या नावांमध्ये विनोद तावडे आणि रामदास आठवले यांच्यासोबत माया इवनाते, रामराव वडकुते यांचे नाव पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तसेच, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांनी अर्ज भरला आहे. तर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला आहे. तर, महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नावावर एकमत झाले असून त्यांची तब्येत बरी नसल्याने निवडणूक अधिकार्‍यांनी घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण केली. विशेष म्हणजे या सातही जागांसाठी सात अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असून आता फक्त औपचारिक घोषणाच बाकी आहे.

शरद पवारांनी घरूनच भरला उमेदवारी अर्ज

आज राज्यसभेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत इतिहासाची पहिली नोंद झाली आहे. भाजपकडून चार उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक आणि शिवसेनेकडून एक अर्ज दाखल झाला, तर महाविकास आघाडीचे उमेदवार शरद पवार यांनी स्वतः उपस्थित राहता न देता आपला अर्ज दाखल केला. शरद पवारांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता अर्ज दाखल करण्यासाठी महाराष्ट्रातील निवडणूक अधिकार्‍यांकडून त्यांची शपथ घेण्यात आली. जेजे रुग्णालयाचे अधिक्षक संजय सुरवसे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन शपथपत्र घेतले. त्यानंतर शरद पवारांचे प्रस्तावक जयंत पाटील या अर्जासह विधीमंडळात जाऊन निवडणूक अधिकार्‍यांना अर्ज सादर केला.

संबंधित बातम्या

Back to top button