सर्वच आमदारांना कोणताही निधी मिळत नाही

शिंदेंच्या आमदाराचे पुन्हा धक्कादायक विधान

मुंबई /12 ऑगस्ट : महायुतीमध्ये काहीच आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच सुरू असते. त्यातही अनेक शिवसेना (शिंदे गट) आमदार, नेते हे बर्‍याचदा सरकारविरोधातच असे काही विधान करतात आणि ज्यामुळे मोठे वाद निर्माण होतात. सध्या महायुती मध्ये माना पमानाचे नाट्य रंगलेले अस तानाच आमदार संजय गाय कवाड हे करत असलेल्या वादग्रस्त विधानाची सुद्धा जोरदार चर्चा रंगली आहे.कारण 24 तासांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाविषयी वादग्रस्त विधान करणार्‍या गायकवडांनी आता थेट सरकारबाबतच धक्कादायक विधान केले आहे. गेल्या 10 महिन्यांपासून सर्वच आमदारांना कोणताही निधी मिळत नाहीयेस असे गायकवाडांनी म्हटले आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी मंगळवारी (ता. 12 ऑगस्ट) एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धक्कादायक विधान करत म्हटले की, गेल्या दहा महिन्यांपासून सर्वच आमदारांना कोणताही निधी मिळत नाहीये.

संबंधित बातम्या

Back to top button