संगमनेरमध्ये अकरा वर्षाच्या मुलीवर अ‍ॅसिड हल्ला

मनाचा थरकाप उडविणारी घटना, पिडीत गंभीर जखमी

अहिल्यानगर /17 मार्च : संगमनेरमध्ये अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. इयत्ता सहावीच्या विद्यार्थीनीवर अज्ञात आरोपीने थेट सिड हल्ला केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या ते दहा ते बरा वर्षाच्या मुलीवर अशाप्रकारे हल्ला झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी जात होती. आपल्यावर अशाप्रकारे हल्ला होईल? असं तिला कधीही वाटलं नव्हतं. पण अचानक एका नराधमाने तिच्यावर थेट सिड हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या चेहर्‍याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर शाळेत शिक्षण घेणार्‍या चिमुकली मुलीदेखील सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.संगमनेर तालुक्यात पुन्हा एकदा मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव पान परिसरात शाळा सुटल्यानंतर घरी परतणार्‍या अवघ्या पाचवी-सहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने सिड फेकून हल्ला केला. या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शाळेतून घरी जात असताना अचानक हल्लेखोराने मुलीवर अ‍ॅसिड फेकल्याची माहिती समोर येत आहे. हल्ल्यानंतर मुलीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक तत्काळ धावून आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती देत मुलीला उपचारासाठी लोणी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

संबंधित बातम्या

Back to top button