आरोपी विजयला फाशीची शिक्षा
डोंगराळे अत्याचार-हत्या प्रकरणात मालेगाव फास्टट्रॅक न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

पीडितेच्या कुटुंबीयांना 10 लाखांची भरपाई देण्याचे आदेश
ज्येष्ठ सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांचा यशस्वी युक्तिवाद
नाशिक /16 ऑक्टोबर : संपूर्ण राज्यात खळबळ उडवणार्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षीय लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या प्रकरणासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. 16 नोव्हेंबर 2025 ला साडेचार वर्षीय चिमुरडीवर 21 वर्षीय विजय खैरनार या नराधमाने लैंगिक अत्याचार करत तिचा गळा आवळून अमानुषपणे खून केला होता. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. अखरे आज ( दि.16 ऑक्टोबर ) तब्बल दहा महिन्यानंतर मालेगावच्या अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल देत अखेर विजय खैरनार या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणी पीडित कुटुंबाला न्याय देत कोर्टानं आज निकाल दिला आहे.
दरम्यान, जिल्हा व अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.जी.पालदेवार यांनी या संदर्भात निकाल देत शिक्षा सुनावली आहे. दुर्मिळतील दुर्मिळ घटना असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. तर पीडितेच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये देण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले आहे. तर आरोपी विजय खैरनार व त्याचे वकील व्हिडिओ कॉन्फरनसिंग द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. निकालावेळी पीडितेचे कुटुंबीय, मंत्री दादा भुसे यांच्यासह सामाजिक, राजकीय संघटना पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील कोर्टाच्या परिसरात उपस्थित होते. तर पीडितेकडून विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांच्यासह अॅड. स्नेहा शर्मा ठाकरे, अॅड. संजय सोनवणे यांनी काम बघितल्याची माहिती आहे. तर आरोपीकडून अॅड.राठी यांनी कामकाज बघितले.
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे 16 नोव्हेंबर 2025 ला साडेचार वर्षीय चिमुरडीवर 21 वर्षीय विजय खैरनार या नराधमाने लैंगिक अत्याचार करत तिचा गळा आवळून अमानुषपणे खून केला होता. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आज ( दि.16 ऑक्टोबर ) तब्बल दहा महिन्यानंतर या घटनेचा मा.अपर जिल्हा व सत्र न्यायालय, मालेगाव येथे पोक्सो जलदगती न्यायालयात न्याय निर्णय देण्यात आला आहे. अतिशय घृणास्पद व निंदनीय कृत्य करणार्या विजय खैरनार या नराधमाला आज मा.न्यायालय जन्मठेपेची शिक्षा सुनावणार की फाशी ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. अखेर न्यायालयने या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे. मालेगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सुरुवातीस 23 दिवसांत 425 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते





