51 आयपीएससह 85 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

काहींना प्रमोशन तर काहींचे डिमोशन

-गृह विभागाने काढले आदेश
मुंबई / 27 जून: राज्यातील महायुती सरकारकडून गेल्या काही महिन्यात आएएस आणि आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचा धडाका लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सातत्याने बदल्या होत असून आता तब्बल 51 आयपीएस अधिकार्‍यांसह 85 वरिष्ठ पदावरील पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, धुळे, हिंगोली, जळगाव येथील अधिकार्‍यांचा समावेश आहे.
तब्बल 85 वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून 51 आयपीएस अधिकार्यांपैकी काहींना प्रमोशन तर काहींचे डिमोशन करुन बदली करण्यात आली आहे. पुण्यातील परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे बदली करण्यात आली असून वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांची देखील बदली करण्यात आली आहे. राज्य पोलीस दलातील 85 पोलीस अधिक्षक-पोलीस उपायुक्त पदावरील पोलीस अधिकार्यांची आज (27 जून) गृहविभागाने बदली केली आहे. त्यात मुंबई शहराला सात नवीन पोलीस उपायुक्त मिळाले असून बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या नऊ पोलीस अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस उपायुक्त-पोलीस अधिक्षकांच्या बदल्या अपेक्षित होत्या. आज गृहविभागाचे सह सचिव व्यकंटेश भट यांनी राज्य पोलीस दलातील 85 पोलीस उपायुक्त-पोलीस अधिक्षक पदावरील पोलीस अधिकार्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत.
-बारवकर, सागर पाटील यांची बदली
अमरावतीचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिक्षक पवन बनसोड यांची ठाणे, अमरावतीच्या पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांची सांगली, पोलीस उपायुक्त सागर पाटील यांची महाराष्ट्र राज्य आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे. तर नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या अप्पर पोलीस अधिक्षक प्रदीप वसंतराव जाधव यांची अमरावतीच्या गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य नागरी दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र-फोर्स वनचे अप्पर पोलीस अधिक्षक रत्नाकर नवले यांची अमरावतीच्या नागरी हक्क संरक्षण विभागात बदली झाली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त श्याम घुगे अमरावतीला बदलून येणार आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button