व्यायाम करणार्‍या 6 मुलांना ट्रकने चिरडले, चौघांचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यात- भीषण अपघात

*मुख्यमंत्री फडणवीसांकडून मदत जाहीर

गडचिरोली /7 ऑगस्ट : गेल्या काही काळात अपघाताच्या घटनांमध्ये वाद झाल्याचे पाहायला दिसून येत आहे. गुरुवारी (7 ऑगस्ट) गडचिरोली जिल्ह्यातही भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्यावर व्यायाम करणार्‍या 6 तरुणांना ट्रकने चिरडल्याची भयंकर घटना जिल्यातील काटली या ठिकाणी घडली. यामध्ये 4 तरुणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पण या घटनेची दखल स्वतः मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील घेतली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी काटली येथील 6 तरूण गडचिरोली -नागपूर राष्ट्रीय महामार्गावर व्यायाम करत होते. ते व्यायाम करत असताना एका भरधाव ट्रकने त्यांना उडवले. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले, तर इतर दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच इतर 2 जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेमुळे काटली गावावर शोककळा पसरली आहे. संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम करून आपला आक्रोश व्यक्त केला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संतप्त जमावाला शांत करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी धडक देणार्‍या वाहनाचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदीही केली असून या प्रकरणी सर्वच वाहनांची कसून चौकशी केली जात आहे.

*मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा                                                                                                                          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. महामार्गावर झालेल्या अपघातात ४ तरुणांचा मृत्यू होणे हे अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. मी त्यांच्याप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. या घटनेत २ तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना पुढील उपचारांसाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. मृतांच्या वारसांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे. जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल.

संबंधित बातम्या

Back to top button