मुंबई लोकल ट्रेनमध्ये भीषण अपघात,5 जणांचा मृत्य
13 गंभीर प्रवाशी रुग्णालयात दाखल, मृतांच्या वारसांना शासनाकडून मदत जाहीर

*मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश
ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या पुढे सीएसएमटीच्या दिशेने जाताना येणार्या वळणावर आज (9 जून) मोठा अपघात झाला. मुंब्रा स्थानकाच्या पुढे येणार्या वळणावर दोन्ही लोकल बाजूला आल्याने फूटब्रीजवरून प्रवास करणारे प्रवासी एकमेकांवर आदळले आणि लोकलच्या खाली पडले. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 13 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे. दरम्यान, आता मृतांच्या वारसांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. गिरीश महाजन म्हणाले की, मुंब्य्राच्या अलिकडे वळणावर दोन लोकल एकमेकांना क्रॉस करत असताना सदर अपघात घडला. हा अपघात नेमका कसा घडला याबाबत उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. या अपघातातील जवळपास 10 रुग्णांना कळवा रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्यातील दोन गंभीर रुग्ण आहेत. त्यामुळे त्यांना ज्युपिटर रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. त्यांच्यावर सीटीस्कॅन आणि एमआरए झालं आहे. त्या रुग्णालयांवर शस्रक्रिया करायची आहे, याबाबत मी माहिती घेत आहे. तसेच जे 7 रुग्ण याठिकाणी आहे, ते फ्रॅक्चर आहेत. पण आऊटऑफ डेंजर आहेत. त्यांच्यावरही आज किंवा उद्या शस्रक्रिया केली जाईल. त्यानंतर त्यांना घरी पाठवलं जाईल. गिरीश महाजन म्हणाले की, मी रुग्णांना भेटलो, त्यांनी सांगितलं की, आम्ही अनेक वर्षांपासून या मार्गावर प्रवास करत आहोत. पण असं कधीही झालं नाही. त्यामुळे हा अपघात का झाला? कशामुळे झाला? याची चौकशी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या अपघातामध्ये ज्या 4 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांना मदत म्हणून आम्ही 5 लाख रुपये जाहीर केले आहेत. याशिवाय जे जखमी आहेत, त्यांना 50 हजार, एक लाख किंवा दोन रुपये दिले जातील. तसेच त्यांचा सर्व उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल. याशिवाय ज्युपिटरला जे दोन रुग्ण गंभीर आहेत, त्यांचा सर्व खर्च शासन करेल, अशी माहिती महाजन यांनी दिली.