12,900 सरकारी कर्मचार्‍यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ

ठढख मधून मोठा गैरप्रकार उघड

मुंबई: राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार (ठढख) अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असलेल्या हजारो सरकारी कर्मचार्‍यांनी थेट शासकीय निधीचा फायदा घेतल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून सरकारने संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दरमहा 1,500 रुपये जमा केले जातात. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि अनेक महिलांना याचा थेट आर्थिक आ धार मिळाला. मात्र याच काळात नियमांचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणावर अपात्र अर्ज मंजूर झाल्याचा प्रकार आता समोर आला आहे. ठढख मधून मिळालेल्या माहितीनुसार, किमान 12,900 पेक्षा अधिक सरकारी कर्मचार्‍यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. नियमांनुसार नियमित वेतन घेणारे सरकारी कर्मचारी या योजने साठी अपात्र आहेत. असे असतानाही संबंधित कर्मचार्‍यांच्या खात्यावर दरमहा 1,500 रुपये जमा करण्यात आले. महिला व बालविकास विभागाने दिलेल्या अधिकृत उत्तरात 12,915 सरकारी कर्मचार्‍यांना या योजनेअंतर्गत पैसे देण्यात आल्याचे मान्य करण्यात आले आहे. महिला व बालविकास विभागाने आपल्या उत्तरात संबंधित सरकारी कर्मचार्‍यांविरोधात त्यांच्या विभागांना कारवाईचे आदेश दिल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, सरकारकडून सध्या लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पुन्हा एकदा छाननी सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button