युवक देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू

नवी दिल्ली/12 जानेवारी  : विकसित भारत 2047 मध्ये म्हणजेच स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाकडे वाटचाल करत असताना देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू युवक असतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. नवी दिल्लीत आयोजित ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026’च्या समारोप सत्रात ते बोलत होते. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत समारोप सत्राचे आयोजन कर ण्यात आले होते. यावेळी देशातील युवकांच्या भूमिकेवर भर देत देशातील युवकांसाठी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे महत्त्व पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले आणि देशभरातून दिल्लीत आलेल्या युवकांना प्रोत्साहित केले. दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया, राज्यमंत्री रक्षा खडसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, स्वामी विवेकानंदांचे विचार आजही युवकांसाठी प्रेरणादायी असून आत्मविश्वास, राष्ट्रभक्तीचा संदेश देतात. तसेच भारताची ताकद, अर्थव्यवस्था आणि जागतिक नेतृत्व युवकांच्या क्षमतेवर अवलंबून आहे. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी युवक नेतृत्व, नाविन्यपूर्ण विचार आणि सक्रिय सहभाग आवश्यक आहे. ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ हा युवकांना थेट विकास प्रक्रियेत सहभागी करणारा प्रभावी मंच ठरत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button