युतीचा निर्णय घ्यायला आम्ही दोन्ही भाऊ सक्षम

त्यासाठी तिसर्‍याची आवश्यकता नाही

*ठाकरेंबंधूंच्या युतीबाबत उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य

नवी दिल्ली/7 ऑगस्ट : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी बुधवारीच राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. दरम्यान, आज गुरुवारी सकाळी दिल्लीतील प्रेस कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरेंनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले.यावेळी बोलताना राज ठाकरेंसोबत युतीबाबतच्या प्रश्नावर उद्धव यांनी ’युतीचा निर्णय घ्यायला आम्ही दोन्ही भाऊ सक्षम आहोत, त्यासाठी तिसर्‍याची आवश्यकता नाही,’ अशा शब्दात आपले मत व्यक्त केले. त्यांच्या या मतानंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या शक्यतांना आणखी बळ मिळाले आहे सध्या सर्व पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य सस्ं थाच्ं यानिवडणुकीसाठी तयारी सरुु झाली आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहबे ठाकरे पक्षाचे पक्षप्रमखु उद्धव ठाकरे हे 3 दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहते .

Back to top button