भाजप आणि निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी

राहुल गांधींनी केली पुराव्यांसह पोलखोल

* महाराष्ट्रातील निवडणुकीवर आक्षेप

नवी दिल्ली/7 ऑगस्ट  : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. त्यांनी नवी दिल्लीतील इंदिरा भवन मुख्यालयात पत्रकार परिषद घेत निवडणुकीमध्ये घोळ झाल्याचे सांगत अनेक सवाल केले आहेत. भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मते चोरली आहेत. या मतांच्या चोरीसाठी आम्ही एक टीम तयार केली होती. यामार्फत आम्ही काही माहिती गोळा केली, असे म्हणत त्यांनी पोलखोल केली. तसेच, निवडणूक आयोगाने आम्हाला डिजिटल डेटा का दिला नाही? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, भाजप निवडणुकीत हेराफेरी करत आहे. बिहारमध्ये मतदार यादीतून नावे गायब झाली आहेत. आता निवडणूक आयोगाने ही यादी बरोबर आहे की चूक याचे उत्तर द्यावे. आता मतदान बराच काळ चालते. लोकसभा निवडणुकीत आपण ते पाहिले. माझा प्रश्न असा आहे की मतदान एकाच दिवसात का संपत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागतो. ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु भाजपला कधीही त्याचा सामना करावा लागला नाही.

*महाराष्ट्रात 40 लाख मतांचा घोटाळा

राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्र निवडणुकीत 40 लाख मतांचा घोटाळा झाला. एक काळ असा होता की ईव्हीएम नव्हते, तरीही मतदान प्रक्रियेचे टप्पे तयार करण्यात आले. त्यामध्ये साधारण महिनाभराचा तरी काळ लागला. एक महिन्याचा काळ आणि टप्प्यांमध्ये निवडणूक कशासाठी? लोकसभा निवडणुकीचा काळ आठवा. आमच्या संशयाला पाठबळ मिळाले तेव्हा महाराष्ट्र निवडणुकीचा आम्ही अभ्यास केला. यातला नेमका तर्क आम्हाला सापडत नव्हता. असे ते म्हणाले.

*पुराव्यांसहीत मांडली आकडेवारी

काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, नव्या मतदारांनी, तरुण मतदरांनी भाजपाला मतदान केले असे सांगण्यात आले. त्यासाठी फॉर्म 6 चा उपयोग करण्यात आला. पण 33 हजार 692 नावांचा दुरुपयोग करण्यात आला. तुम्हाला एक उदाहरण देतो. शकुन राणी नावाची एक महिला आहे ही महिला 70 वर्षांची आहे. तिने दोन वेळा अर्ज क्रमांक 6 भरला. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा फोटो लावला आहे. दुसर्‍यांदा या महिलेने दोनदा अर्ज केला. दुसर्‍या अर्जावर हे नाव फक्त शकुनराणी आहे. या महिलेने दोनदा मतदान केले किंवा दुसर्‍यांदा तिच्या नावे दुसर्‍या कुणीतरी मतदान केले. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

संबंधित बातम्या

Back to top button