कर्जमाफीच्या वादग्रस्त वक्तव्यावर विखे पाटील यांची सारवासारव

अहिल्यानगर – राज्याचे जलसंपदा मंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्ज माफी वरुन केलेल्या वक्त व्याने वाद निर्माण झाला. विखे पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू आक्रमक झाले. त्यांनी विखे पाटील यांच्यावर खरमरीत टीका केली. शेतकर्‍यांमध्ये त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने संताप पसरला. आपल्या वक्तव्याची जाणीव झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी अखेर स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, माझा डीएनए पण शेतकर्‍याचे आहे. पण आता भाषण करण्याचीसुद्धा पंचाईत झाली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री म्हणाले, परवा मी एका कार्यक्रमात गेलो होते. तिथे मी भाषण केले, ते दाखवलेच नाही. दुसरंच दाखवलं. सोसायटीतून कर्ज काढा, बँकेतून कर्ज घ्या आणि ते थकलं की कर्जमाफी मागा. एवढंच दाखवलं. भाषणातील पुढचं वाक्य दाखवलंच नाही.

संबंधित बातम्या

Back to top button