उदयनिधी स्टॅलिन म्हणाले- सनातन धर्म संपवला पाहिजे

चेन्नई/12 मे-तामिळनाडूचे माजी उपमुख्य मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी मंगळवारी विधान सभेत सांगितले की, लोकांना विभा जित करणार्‍या सनातन धर्माला निश्चितपणे संपवले पाहिजे. त्यांनी तमिळ थाई वाझ्थुला प्रत्येक सरकारी कार्यक्रमात प्राधान्य देण्याची मागणीही केली. उदयनिधींनी नुकत्याच झालेल्या शपथविधी समारंभाचा उल्लेख करत आरोप केला की, तामिळनाडूचे पारंपरिक तमिळ आवाहन गीत ‘तमिळ थाई वाझ्थु’ला कार्यक्रमात तिसर्‍या स्थानावर ठेवण्यात आले, तर परंपरेनुसार त्याला प्राधान्य मिळायला हवे होते. उदयनिधी म्हणाले. आम्ही हे सहन करणार नाही. तामिळनाडूमध्ये कोणत्याही सरकारी कार्यक्रमात तमिळ थाई वाझ्थुला पहिले स्थान मिळाले पाहिजे. उदयनिधींनी यापूर्वीही 2023 मध्ये सनातनाला डेंग्यू, मलेरिया म्हटले होते. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2024 मध्ये त्यांना फटकारले होते.

संबंधित बातम्या

Back to top button