ही निवडणूक बिहारच्या इतिहासात नवे पर्व लिहिणारी

पंतप्रधान मोदी यांनी युवा कार्यकर्त्यांशी साधला संवाद

बिहार/23 ऑक्टोबर – बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा माहोल तापत आहे. राज्यातील 243 जागांसाठी दोन टप्प्यांत, म्हणजेच 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर निकाल 14 नोव्हेंबरला जाहीर होईल. निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी “मेरा बूथ सबसे मजबूत” या कार्यक्रमाद्वारे बिहारमधील युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी बिहारच्या तरुणांना विकास, जनविशास आणि स्थिर सरकारचे महत्त्व समजावताना विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला.

मोदी म्हणाले की, ही निवडणूक बिहारच्या इतिहासात नवे पर्व लिहिणारी ठरेल आणि बिहारच्या तरुणांनी या परिवर्तनात मुख्य भूमिका बजवायची आहे. आज देश विकासाच्या महायज्ञात सहभागी झाला आहे आणि बिहारही त्यात खांद्याला खांडा लावून चालत आहे. रुग्णालये, शाळा, नवे रेल्वे मार्ग – सर्व क्षेत्रांत प्रगती सुरू आहे आणि याचे श्रेय स्थिर सरकारला जाते. त्यांनी पुढे म्हटले की, स्थैर्य असल्यासच विकासाची गती वाढते. म्हणूनच आज बिहारचा प्रत्येक तरुण म्हणत आहे – “रफ्तार पकड़ चुका है बिहार, फिर से NDA सरकार!” पंतप्रधानांनी युवकांना आवाहन केले की, प्रत्येक मतदान केंद्रावर तरुणांनी एकत्र येऊन वयोवृद्ध नागरिकांच्या अनुभवांमधून शिकावे आणि इतिहासातील त्या काळाच्या आठवणी नव्या पिढीपर्यंत पोहोचवाव्यात. त्यांनी सांगितले की, छठीच्या सणानंतर 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिनानिमित्त गावागावात, वार्डवार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड आयोजित करावी. ही एकता दौड राष्ट्रीय अभिमानाची अभिव्यक्ती असावी, असे मोदी म्हणाले.

तरुण मतदारांच्या भूमिकेवर भर देताना पंतप्रधान म्हणाले, “मला सर्व शक्ती 140 कोटी जनतेच्या एका मतातून मिळते. त्या मताची ताकद एवढी आहे की आज राम मंदिर उभे आहे, नक्षलवादावर आळा बसत आहे, आणि देश प्रगतीकडे वेगाने वाटचाल करत आहे. बिहारच्या जनतेला मताच्या शक्तीची खरी जाण आहे. एकदा जंगलराज हटवल्यानंतर ते पुन्हा त्या अंधारात परतू इच्छित नाहीत.” महागठबंधनावर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले, “ज्यांना स्वतःला गठबंधन म्हणवायचे आहे, बिहारची जनता त्यांना ‘लठबंधन’ म्हणते. हे लोक फक्त भांडणे आणि सत्तेसाठी लाठी चालवणे जाणतात. त्यांच्या राजवटीत नक्सलवाद आणि माओवादी दहशतीने बिहारच्या दोन पिढ्या उद्ध्वस्त झाल्या. एनडीए सरकारने बिहारला जंगलराजच्या अंधारातून विकासाच्या उजेडात आणले आहे.”

संबंधित बातम्या

Back to top button