शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आता शुक्रवारी

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयतीदिनी ठरणार शिवसेना कोणाची?

दिल्ली /21 जानेवारी – शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. शुक्रवारी 23 जानेवारीपासून ही सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे याबा बतची अंतिम सुनावणी आज पासुन सर्वोच्च न्याय लायत सुरु होणार होती. सुनावणी सुरु होण्यापूर्वीच पुढची तारीख मिळाली आहे. येत्या 23 जानेवारीपासून सुनावणी सुरु होणार आहे, विशेष म्हणजे 23 जानेवारी रोजी शिवसेना स्थापन करणारे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी सुनावणीला सुरुवात होऊन जन्मशताब्दी वर्षात तरी पक्ष आणि चिन्ह कोणाचे याचा निर्णय होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या नाव आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती.

संबंधित बातम्या

Back to top button