केंद्र सरकार शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देणार

केंद्रीयमंत्री अमित शाहांनी दिलं ओशासन

* पंचनाम्याचा सविस्तर अहवाल पाठवावा

नवी दिल्ली/5 ऑक्टोबर – राज्यातील मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत असून, केंद्र सरकार शेतकर्‍यांना काही मदत जाहीर करणार का? असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. यातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शिर्डी दौर्‍यावर होते. यावेळी अमित शाह यांनी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याबाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने केंद्र सरकारला पंचनाम्याचा सविस्तर अहवाल पाठवावा, त्यानंतर पंतप्रधान मोदी लगेचच मदत जाहीर करतील. अमित शाह यांनी हे प्रवरालोणी येथील कार्यक्रमात सांगितले.

अमित शाह म्हणाले की, प्रवरानगर ही भूमी सहकार क्षेत्रातील पंढरी मानली जाते, त्याचे मूळ कारण पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आहेत, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी समर्पित केले. मात्र, या वर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, 60 लाख हेक्टर पेक्षा जास्त शेती प्रभावित झाली आहे. 2025-26 वर्षांसाठी केंद्र सरकारने शेअर्सच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला 3132 कोटी रुपये दिले असून, त्यातील 1631 कोटी रुपये एप्रिलमध्ये पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारही उपाययोजना करत असून, 2215 कोटींचा रिलीफ फंड सरकारने जाहीर केला आहे. त्यात प्रत्येकी 10 हजार रुपयांची रोख मदत, 25 किलो धान्य देण्याची तरतूद आणि कर्जमाफीच्या होणाऱ्या वसूलीसाठीही थांबवण्याचे निर्देश आहेत.

अमित शाह म्हणाले की, महाराष्ट्र सरकारमधील हे त्रिमुर्ती व्यापारी नसले तरी व्यापाऱ्यांपेक्षा कमी नाहीत. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी बोलवल्यानंतर त्यांनी विचारले की, केंद्र सरकार महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांसाठी काय करेल. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी काल अमित शाह यांच्यासोबत बैठक घेतली, ज्यावेळी अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींच्या वतीने महाराष्ट्र सरकारला सांगितले की, शेतकर्‍यांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल पाठवला गेला की पंतप्रधान मदत जाहीर करतील, कारण महाराष्ट्रातील जनतेने शेतकर्‍यांचे हित जोपासणारं सरकार निवडले आहे.

* 15 साखर कारखान्यांना सीएनजी युनिट उभारण्यास प्राधान्य

सहकार क्षेत्रात सीएनजी व पोटॅश निर्मितीच्या माध्यमातून व त्याची विक्री व्यवस्था करून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला आहे. याच पद्धतीने देशात 15 सहकारी साखर कारखान्यांमध्ये अशा प्रकारचे युनिट उभारण्यास प्राधान्य दिले जाईल. महाराष्ट्रातील अधिकाधिक कारखान्यांचा त्यात सहभाग असेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.कोपरगाव येथे देशातील पहिल्या सहकारी तत्त्वावरील कॉम्प्रेस्ड बायो गॅस प्रकल्प व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्पाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

संबंधित बातम्या

Back to top button