शरद पवारांच्या मंडल यात्रेचा हेतू

ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नय

*प्रकाश आंबेडकरांचा आरोप

नवी दिल्ली/10 ऑगस्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात मंडल यात्रा काढण्यात येत आहे. क्रांती दिनाचे औचित्य साधत नागपुरातून सुरू केलेल्या मंडल यात्रेला ज्येष्ठ नेते शरद पवार (डहरीरव झरुरी) यांनी नागपूरमध्ये हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. दरम्यान, शरद पवार यांनी काढलेल्या मंडल यात्रेवर महायुती आणि भाजपनं सडकून टीका केली टीका केली आहे. अशातच या यात्रेवरून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश यांनी टीका करत गंभीर आरोप केले आहेत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ओबीसींच्या स्कॉलरशिपला राष्ट्रवादीकडून विरोध करण्यात आला होता. ओबीसी हा श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात जातोय, श्रीमंत मराठा हा एनसीपीचा बेस आहे. श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात ओबीसी जाणार नाही, हाच या पाठीमागचा राजकीय हेतू आहे. असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. ओबीसींच कल्याण हा या यात्रेचे हेतू नाही. तर मागच्या निवडणुकांमध्ये ओबीसी भाजपकडे झुकला, यात दुमत नाही. मात्र आता ओबीसींच्या लक्षात आले एक नागनाथ आहे आणि दुसरा साधनाग आहे. अशी बोचरी टीका हि त्यांनी केलीय.

संबंधित बातम्या

Back to top button