पंतप्रधान मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा विक्रम

बनले सर्वाधिक काळ राहिलेले दुसरे पंतप्रधान

नवी दिल्ली/ 25 जुलै  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधींचा विक्रम मोडलाय. ते सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेलं दुसरे नेते बनले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 जुलै रोजी अधिकृतपणे सर्वाधिक काळ भारताच्या पंतप्रधान राहिले आहेत. सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याची नोंद इतिहासात झालीय. याआधी इंदिरा गांधी ह्या सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहणार्‍या पंतप्रधान होत्या.
1966 ते 1977 दरम्यान इंदिरा गांधी ह्या 4,077 दिवस पंतप्रधानपदावर राहिल्या होत्या. तर पंतप्रधान मोदींची पंतप्रधानपदाची कारकीर्द ही 4,078 दिवस इतकी झालीय. नरेंद्र मोदी आता फक्त भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मागे आहेत. पंडीत जवाहरलाल हे सर्वात जास्त काळ पंतप्रधानपदावर राहिलेत. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात भारताने अद्वितीय कामगिरी केलीय. मोदी स्वातंत्र्यानंतर जन्मलेले भारतातील पहिले पंतप्रधान आहेत. जे सर्वात जास्त काळ राहणारे बिगर-काँग्रेसी पंतप्रधान आहेत. उल्लेखनीय म्हणजे, मोदी हे दोन पूर्ण टर्म पूर्ण करणारे आणि स्पष्ट बहुमताने दोनदा पुन्हा निवडून येणारे पहिले बिगर-काँग्रेसी नेते आहेत. 1971 मध्ये इंदिरा गांधींनंतर सलग सार्वत्रिक निवडणुकीत पूर्ण बहुमताने सत्तेत येणारे ते पहिले विद्यमान पंतप्रधान आहेत. इतकेच नाही तर पंतप्रधान मोदी यांनी सलग तीनवेळा आपल्या पक्षाला विजय मिळवून दिलाय.
मोदींचा राजकीय प्रवास जितका उल्लेखनीय आहे तितकाच तो दमदार आहे. गुजरातमधील वडनगर येथे एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मोदींनी कधी काळी वडिलांसोबत रेल्वे स्टेशनवर चहा विकली होती. आता ते एक जागितक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (आरएसएस) प्रवेश केला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षातून राजकीय करिअरला सुरुवात केली. त्यांनी एका दशकाहून अधिकचा काळ गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्यानंतर ते एक जागतिक नेते बनले आहेत. त्यांच्या जवळजवळ 24 वर्षांच्या राजकीय प्रवासात त्यांनी स्वतःला आंतरराष्ट्रीय नेत्यामध्ये रूपांतरित केले आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button