शेतकर्यांच्या हिताशी तडजोड नाही
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरला पंतप्रधान मोदींचा पलटवार

* दिल्लीतील स्वामीनाथन शताब्दी परिषदेत संबोधन
नवी दिल्ली /7 ऑगस्ट : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी भारतावर 25 टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केली. त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (6 ऑगस्ट) भारतावर 25 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादत असल्याची घोषणा केली. अशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला विरोधकांनी धारेवर धरले होते. पंतप्रधान मोदी आता अमेरिकाला उत्तर देणार का? डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाला पंतप्रधान मोदी विरोध करणार का? असा सवाल विरोधकांनी केला होता. अखेर गुरुवारी (7 ऑगस्ट) एमएस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या टॅरिफचा उल्लेख न करता सांगितले की, आपल्या शेतकर्यांचे हित हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार बंधू-भगिनींच्या हिताशी कधीही तडजोड करणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. तसेच, मला माहिती आहे की मला वैयक्तिकरीत्या मोठी किंमत मोजावी लागेल, पण मी त्यासाठी तयार आहे, असेही ते पुढे म्हणाले. अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के आयात शुल्क लादण्याची घोषणा केल्यानंतर दुसर्याच दिवशी पंतप्रधान मोदींचे हे विधान आल्यामुळे चर्चा होत आहे. सदर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आपल्या शेतकर्यांचा पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या कल्याणासाठी मी प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार आहे. वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता मोदी यांनी ग्रामीण भारताच्या, खेड्यांमधील समुदायांच्या सरं क्षणाच्या जबाबदारीबाबतचा सरकारचा निधार्र मादे ी यानं ी यावळे ी अधारे िे खत के ला. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मत्रं ालयाच े प्रवक्ते रणधीर जयस्वाल यानं ी ट्वीट करत अमिे रके चा हा निणर्य अत्यतं ददु र्वै ी, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याच े मत व्यक्त केले.




