प्रणिती शिंदेंसह खासदार चढले

रोजगार हमी कायद्याचा विरोध

नवी दिल्ली/16 डिसेंबर  : मोदी सरकार ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा’ (मनरेगा) रद्द करणार आहे आणि एक नवीन ग्रामीण रोजगार कायदा आणणार आहे. सध्या नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा नवीन कायदा चर्चेसाठी सूचीबद्ध करण्यात आला आहे. सोमवारी (16 डिसेंबर) लोकसभा खासदारांमध्ये या विधेयकाची प्रत वाटण्यात आली आहे. ‘डेव्हलपिंग इंडिया – गॅरंटी फॉर एम्प्लॉयमेंट अँड लाइव्हलीहूड मिशन (ग्रामीण) बिल, 2025’ असे नाव योजनेला देण्यात आले आहे. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयाविरुद्ध विरोधकांनी एकजूट दाखवली आहे. सर्व विरोधी खासदारांनी सभागृहाच्या आत आणि बाहेर निषेध केला आहे. तसेच काँग्रेस खासदार कुमारी शैलजा यांच्या नेतृत्वाखाली विरोधी खासदारांनी जुन्या संसद भवनाच्या छतावर चढून देखील निषेध केला.केंद्र सरकारने मनरेगाला ‘डेव्हलपिंग इंडिया – गॅरंटी फॉर एम्प्लॉयमेंट अँड लाइव्हलीहूड मिशन (ग्रामीण) बिल, 2025’ असे नाव देण्यासाठी लोकसभेत विधेयक सादर केले आहे. मात्र मनरेगा योजनेचे नाव बदलण्यावरून विरोधक संतप्त झाले आहेत. विरोधी पक्षाच्या खासदार संजना जाटव, कुमारी सेलजा, मोहम्मद जावेद, प्रणिती शिंदे, मनोज राम आणि ज्योत्स्ना महंत यांनी जुन्या संसद भवनाच्या (आता संविधान भवन) छतावर चढून जोरदार निषेध केला. यावेळी सर्व खासदारांनी महात्मा गांधी अमर रहे अशी घोषणाबाजी देखील केली. खासदारांच्या या निषेधाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे खासदारांनी थेट संसदेच्या छतावर चढून आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button