मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
शाहरुख; खान-विक्रांतला सर्वोत्कृष्ट अभिनेता

* राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
नवी दिल्ली/23 सप्टेंबर : 71 वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडला. शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर राणी मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. मल्याळी अभिनेता मोहनलाल यांना चित्रपट उद्योगातील योगदानाबद्दल हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शाल आणि सिल्व्हर लोटस पुरस्कार प्रदान केला, आणि मोहनलाल यांना स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. मोहनलाल यांनी यावेळी सांगितले की, आज येथे उभे राहणे त्यांच्या जीवनातील अभिमानाचा आणि नम्रतेचा क्षण आहे; हा पुरस्कार फक्त त्यांचा नाही तर संपूर्ण मल्याळम चित्रपट कुटुंबाचा आहे. त्यानंतर शाहरुख खानला ‘जवान’ चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, आणि हात जोडून स्टेजवर जाताना तो भावुक झाला. विक्रांत मेस्सीने ‘12ढक फेलसाठी’ सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारला, तर राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. शिल्पा रावला ‘जवान’ चित्रपटातील “चलेया” या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट महिला पोर्शगायिका पुरस्कार मिळाला, आणि वैभवी मर्चंटला ‘ढिंढोरा बाजे रे’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा सिल्व्हर लोटस पुरस्कार मिळाला. एकता कपूर निर्मित ‘कहलला’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तर यशोवर्धन सिंग दिग्दर्शक म्हणून सन्मानित झाले. फेल चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन करणारे विधू विनोद चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मल्याळम अभिनेत्री उर्वशीला ‘ओलुझक्कु’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. शाहरुख खान, राणी मुखर्जी, विक्रांत मेस्सी आणि इतर विजेत्यांना विज्ञान भवनात सन्मानित करण्यात आले.




