मोदींमध्ये दम नाही, फक्त शोबाजी करतात

राहुल गांधींची कठोर शब्दांत टीका

नवी दिल्ली / 25 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये दम नाही, त्यांची फक्त शोबाजी आहे, मी त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो आहे, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. नवी दिल्लीत ओबीसी समुदयासाठी आयोजित भागिदारी न्याय संमेलनात ते बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी हे काही मोठी समस्या नाहीत. मी तुम्हाला सांगतो लोकांनी त्यांना डोक्यावर चढवून ठेवलं आहे. मीडियावाल्यांनी मोदींचा फुगा बनवलाय फक्त, बाकी त्यांची काहीही अडचण नाही. आधीतर मी त्यांना कधी भेटलो नव्हतो पण आता दोन-तीन वेळा मी त्यांना भेटलो आहे. त्यांची गोष्ट मला आता कळाली आहे, काहीही खास नाही त्यांच्यात. फक्त शोबाजी आहे, दम नाही त्यांच्यात. तुम्ही त्यांना भेटलेले नाहीत, मी भेटलो आहे. खोलीत बसून त्यांच्याशी गप्पा मारल्यात मी, असे राहुल गांधी म्हणाले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवरुन राहुल गांधी यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये राहुल गांधी ओबीसी समुदयाच्या संमेलनात व्यासपीठावरुन बोलत आहेत. यावेळी मोठा जनसमुदाय समोर बसलेला आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख निघताच त्यांची फक्त शोबाजी असतो ठोस काहीही काम नसतं, अशा कठोर शब्दांत त्यांच्यावर टीका केली. दरम्यान, राहुल गांधी यांच्या विधानावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपकडून अद्याप त्यांच्या विधानावर कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

संबंधित बातम्या

Back to top button