खा. कंगना रणौत गोत्यात; देशद्रोहाचा खटला चालणार

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघाच्या खासदार आणि भाजप नेत्या कंगना रणौत अडचणीत आल्या आहेत. आग्रा न्यायालयात त्यांच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली असून ती स्वीकारण्यात आलेली आहे. शेतकरी आणि स्वातंत्र्य सैनिकांविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानाप्रकरणी दाखल करण्यात याचिकेवर आता पुन्हा सुनावणी सुरु झाली आहे. कंगना रणौत यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालवला जाणार आहे. ’कंगना रणौत यांच्याकडून कोणतंही कायदेशीर उत्तर देण्यात आलं नाही. त्यामुळे न्यायालयानं हे प्रकरण बंद केलं. पण मी या प्रकरणात पुनर्विचार याचिका दाखल केली. ती आता न्यायालयानं स्वीकारली आहे. या प्रकरणी आता पुन्हा नव्यानं सुनावणी सुरु करण्यात आली आहे,’ असं शर्मा यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

Back to top button