खा.रेणुका चौधरी कुत्र्याला घेवून थेट संसदेत

नवी दिल्ली– खा. रेणुका चौधरी एका अनोख्या वादात सापडल्या. त्या त्यांच्या पाळीव कुत्र्यासह त्यांच्या गाडीतून संसदेत पोहो चल्या. भाजपने याला संसदेच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. जेव्हा माध्यमांनी रेणुका चौधरी यांना या घटनेबद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, यात वाद काय आहे? कुठे असा नियम आहे की कुत्रा आणू नये? मी संसदेकडे येत होते. रस्त्यात एक स्कूटर गाडीला धडकली आणि एक छोटं पिल्लू रस्त्यावर भटकत होतं. ते गाडीत चिरडले जाईल म्हणून मी ते उचललं, कारमध्ये ठेवलं आणि संसदेत आले.

संबंधित बातम्या

Back to top button