इंडिया आघाडी सत्तेत आल्यास निवडणूक आयोगावर कारवाई

राहुल गांधींचा इशारा, मतदार हक्क यात्रेतून हल्लाबोल

पटणा / 18 ऑगस्ट : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी भारतीय निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा धडकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी आणि आयोगामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, रविवारी बिहारमधील गयामध्ये झालेल्या सभेत राहुल गांधींनी थेट इशारा दिला. जर केंद्रात आणि बिहारमध्ये इंडिया आघाडीचे सरकार आले, तर मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांवर मत चोरी केल्याबद्दल कारवाई केली जाईल, असे विधान त्यांनी केले. राहुल गांधींच्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. मतदार याद्यांमध्ये फेरफार करून निवडणूक प्रक्रियेत अन्याय झाल्याचा ठपका त्यांनी ठेवला होता. यावर आयोगाने पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळले होते. परंतु राहुल गांधींनी त्यानंतरही हल्ला सुरूच ठेवत बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ काढली. या यात्रेतून त्यांनी मतदारांशी संवाद साधत आयोगावर अविेशास दाखवला. सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक  आयोग आमच्याकडून प्रतिज्ञापत्र मागतो, पण संपूर्ण देश लवकरच तुमच्याकडून प्रतिज्ञापत्र मागेल. प्रत्येक राज्यात, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आम्ही तुमची चोरी उघड करणार आहोत. जनता आयोगाच्या कारभाराची साक्षीदार आहे आणि ही सत्यता आता लपवता येणार नाही.

संबंधित बातम्या

Back to top button