माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची तब्येत बिघडली

नवी दिल्ली/12 जानेवारी -देशाचे माजी उपराष्ट्रपती जग दीप धनखड यांच्या प्रकृती बाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. धनखड गेल्या आठवड्यात दोनदा बेशुद्ध पडले, ज्यानंतर त्यांना सोमवारी दिल्लीतल्या -खखचडमध्ये दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून, विविध तपासण्या केल्या जात आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, जगदीप धनखड 10 जानेवारी रोजी वॉशरुममध्ये दोनदा बेशुद्ध पडले. यानंतर तातडीने त्यांना -खखचडमध्ये नेण्यात आले. आज त्यांना पुढील तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. धनखड यापूर्वीही अनेक वेळा बेशुद्ध/भोवळ येण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात कच्छचे रण, उत्तराखंड, केरळ आणि दिल्ली येथील विविध कार्यक्रमांसा समावेश आहे. या घटना त्यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या काळात सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान घडल्या होत्या. याच आरोग्य कारणास्तव त्यांनी 21 जुलै रोजी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता.




