हैद्राबाद, सोलापुरात अग्नितांडव : 25 जणांचा होरपळून मृत्यू
मृतांमध्ये लहान बालकांचाही समावेश

-केंद्र व राज्य सरकारांकडून मदत जाहिर
-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
हैद्राबाद/ 18 मे : तेलंगनातील हैद्राबाद आणि महाराष्ट्रातील सोलापूर येथे आज रविवारी सकाळी भीषण अग्नीतांडव घडले. हैद्राबाद येथे प्रसिद्ध चारमीनार परिसरात लागलेल्या आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यु झाला तर सोलापूर येथे पहाटे चार वाजता एका टॉवेल कारखान्यात लागलेल्या आगीत 8 जण होरपळले व त्यांचा मृत्यु झाला. दोन्ही घटनेत अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोलापूरच्या घटनेत टॉवेल कारखान्याच्या मालकाचे कुटुंब मृत्युमुखी पडले. त्यात एका वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. दोन्ही घटनेतील मृतकांचे कुटुंबिय आणि जखमींना केंद्र आणि राज्य सरकारांनी आर्थिक मदत जाहिर केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनांबद्दल शोक व्यक्त केला आहे.