निवडणूक आयोगाचे राहूल गांधींना शपथपत्र

1 लाख मतदारांची नावे यादीतून हटवली

*आरोप खोटे आढळल्यास कायदेशीर कारवाई होणार

नवी दिल्ली/7 ऑगस्ट  : मतदान प्रक्रियेवरून काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी निवडणूक आयोगा वर सतत टीका करत असतात. राहुल गांधींनी महाराष्ट्र, हरियाणा आणि लोकसभा निवडणुकां मध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केलाय. आता त्यांनी कर्नाटकच्या निवडणुकी वरून निवडणूक आयोगावर आता टीकास्त्र डागलंय. कनार्ट कात मतदार यादीतनू एक लाख लोकांची नावे काढून टाकण्यात आली. त्यामुळे मत चोरीला गेली, असा आरापे राहलु गांधींनी केला होता. आता कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकरणी राहलु गांधींना एक प्रतिज्ञापत्र पाठवलंय. तुम्ही खरे आरोप करत आहात तर या शपथपत्रावर सही करा. जर त्याचे दावे खोटे असल्याचे आढळले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं राहुल गांधींच्या आरोपावर उत्तर दिलंय. पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपावरून कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी त्यांना एक पत्र पाठवले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button