नदीत शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या 8 जणांचा बुडून मृत्यू

मृतांमध्ये सात महिलांचा समावेश

कन्नड/24 मे-कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील एका गावामध्ये नदीत बुडून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण नदीत शिंपले गोळा करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी हे अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने एकापाठोपाठ एक सर्वजण वाहून गेले. मृतांमध्ये सात महिलांचा समावेश आहे. तसेच दोघे जण अद्याप बेपत्ता आहेत. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार हे सर्वजण शिंपले गोळा करण्यासाठी नदीत उतरले होते. तसेच हळूहळू खोल पाण्याच्या दिशेने गेले. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा त्यांना अंदाज आला नाही. परिसरात पाऊस पडत असल्याने नदीमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. तसेच या पाण्यातून सुरुवातीला दोन ते तीन जण वाहून गेले. त्यानंतर इतरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात तेही वाहून गेले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेतच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि विरोधाी पक्ष नेते आर. अशोका यांनीही या दुर्घटनेनंतर मृतांप्रति शोक व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button