रोजगारासाठी प्रोत्साहनपर योजनांना केंद्राची मंजूरी
सरकारने घेतला मोठा निर्णय

* पहिल्या नोकरीवर देणार पैसे
* 1.07 लाख कोटींचा खर्च
नवी दिल्ली/ 1 जुलै : केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रमुख योजनांना मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने रोजगाराशी संबंधित असलेल्या प्रोत्साहनपर योजनांना मंजुरी दिलीय. या योजनेचा लाभ दोन टप्प्यांमध्ये मिळेल. पहिल्या टप्प्यात, पहिल्यांदाच नोकरी मिळवणार्या कर्मचार्यांना जास्तीत जास्त 15 हजार रुपये दोन हप्त्यांमध्ये दिले जाणार आहेत. नोकरी मिळाल्यापासून सहाव्या आणि 12 व्या महिन्यात हा हप्ता दिला जाणार आहे. तर दुसर्या टप्प्यात, दरमहा 3000 रुपये दिले जातील. संपूर्ण योजनेत उत्पादन क्षेत्रात रोजगाराला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाईल. पत्रकार परिषदेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री अिेशनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. मंत्री अिेशनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार या योजनेवर एकूण 1.07 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. या योजनेचा हेतू सर्व क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती, रोजगारक्षमता वाढवणे आणि सामाजिक सुरक्षा वाढवणे हा आहे. यात उत्पादन क्षेत्रावर विशेष लक्ष दिले जाईल.




