भाजपची 12 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
गायिका मैथिली ठाकूरला उमेदवारी

नवी दिल्ली/15 ऑक्टोबर – शनिवारपासून दिवाळी सण सुरू होणार असून, त्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये सध्या गर्दी आहे आणि लोक सणाच्या खरेदीसाठी व्यस्त आहेत. यामुळे शहरातील प्रमुख व्यावसायिक भागात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे, तर गर्दीचा फायदा घेत चोरटेही सक्रीय झाले आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मौल्यवान वस्तू पूजेसाठी बाहेर काढल्या जात असल्याने चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी शहरातील सर्व प्रमुख पोलिस अधिकार्यांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांची बैठक घेतली. दिवाळी सणापूर्वी शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या गेल्या. बैठकीला तीन पोलिस उपायुक्त, पाच सहाय्यक पोलिस आयुक्त आणि आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, गुन्हे शाखा आणि वाहतूक पोलिस यांचा समावेश होता.
बैठकीदरम्यान पोलिस आयुक्त अरविंद चावरियांनी सांगितले की, दिवाळी सणामुळे शहरात गर्दी वाढत आहे आणि मोठ्या संख्येने लोक खरेदीसाठी व्यावसायिक भागात येत आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या राजकमल चौकातून रेल्वे स्टेशनकडे जाणारा रेल्वे उड्डाणपूल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असल्याने पर्यायी मार्गांवर लोक आणि वाहनांची मोठी गर्दी होत आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी होते. या संदर्भात, वाहतूक पोलिस आणि संबंधित भागातील पोलिस ठाण्यांनी सुरळीत आणि अखंड वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच, शहरातील चोरी, घरफोडी आणि इतर गुन्हेगारी घटनांमध्ये प्रतिबंधासाठी सर्व व्यावसायिक आणि निवासी भागात पोलिसांची गस्त आणि रात्रीची गस्त वाढवावी. पोलीस ठाण्यांमध्ये प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणांचा तपास करणे, आरोपपत्र लवकर न्यायालयात सादर करणे आणि जबरदस्ती व गुंडगिरीच्या कृत्यांमध्ये सहभागी गुन्हेगारांवर कडक कारवाई करणे आवश्यक असल्याचे सीपी चावरियांनी स्पष्ट केले.




