सोनिया गांधी, राहुल गांधींना मोठा दिलासा
न्यायालयाने ’ईडी’चे आरोपपत्र फेटाळले

नवी दिल्ली/16 डिसेंबर – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात राहुल आणि सोनिया गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) दाखल आरोपपत्राची दखल घेण्यास निकार दिला आहे. कोर्टाचा हा निर्णय सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. कोर्टाने आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, मनी लाँड्रिंग आणि त्यासंबंधीची चौकशी हे तोपर्यंत ग्राह्य धरले जाऊ शकत नाही जोपर्यंत नियमानुसार फौजदारी गुन्ह्याचा एफआयआर दाखल होत नाही. कोर्टाने म्हटले की, पीएमएलए (प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट) च्या नियमानुसार ईडीने तपास सुरु करण्यापूर्वी संबंधीत गुन्ह्यात एफआयआर दाखल असणे गरजेचे आहे.
कोर्टाने ईडीला फटकारले-गेल्या काही महिन्यांपासून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांची आई तथा काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात ईडीकडून मनी लाँड्रिंगचे आरोप होत आहेत.




