ध्वजारोहण सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली
100 टन फुलांची सजावट

नवी दिल्ली/24 नोव्हेंबर : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम पूर्ण झाले असून त्यावर उद्या म्हणजे 25 नोव्हेंबर रोजी भगवी पतका फडकवली जाणार आहे. सीता स्वयंवर हा एक पौराणिक प्रसंग आहे, जो विवाह पंचमी या हिंदू सणादरम्यान साजरा केला जातो. उद्या विवाह पंचमी असल्यामुळे मंदिरावर 11 फूट रुंद आणि 22 फूट लांबीचा ध्वज फडकवला जाणार आहे. या धर्मध्वज किंवा सोहळा ध्वजारोहण सोहळ्या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तर सरसंघचालक मोहन भागवत आज (24 नोव्हेंबर) संध्याकाळी अयोध्येत दाखल होणार आहेत.श्रीराम मंदिरावरील ध्वजारोहण सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे. मंदिर परिसरात फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत तर शहरात सर्वत्र फुलांची सजावट केली जात आहे. या सोहळ्यासाठी तब्बल 100 टन फुले मागवण्यात आली होती. मंदिरासह शहरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या निमित्ताने देश-विदेशातून भाविक अयोध्येत येत असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सर्व कामांचा आढावा घेतला आहे. अयोध्येतील राम लल्लाच्या मंदिराचे काम पूर्णत्वास गेले आहे. म्हणून त्यावर फडकवल्या जाणार्या ध्वजात तीन प्रतीके आहेत.




